पाथर्डी । वीरभूमी- 13-Aug, 2021, 12:00 AM
तालुक्यातील अकोले गावाचे नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वाने केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचले. (बबनराव ढाकणे Babanrao Dhakane) त्यांच्याबद्दल आम्हाला आजही मोठा आदर व अभिमान आहे. मात्र, ज्यांना अजून सामाजिक, राजकीय कामाचा, निवडणुकीचा अनुभव नाही, अशा व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन (ऋषिकेश ढाकणे Rishikesh Dhakane) आमच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे.
विरोधकावर काय बोलावे, आम्ही काही बोललो कि, ते घरात बसून पत्रकार परिषद घेत व्यर्थ टीका करतात Sitting at home, holding a press conference, they criticize in vain, अशा शब्दात आमदार मोनिका राजळे (MLA Monica Rajale) यांनी राजकीय टीकाकारांना उत्तर देत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सतर्क केलेे आहे (Activists have been alerted for the upcoming elections).
तालुक्यातील खेर्डे, सांगवी, पागोरी पिंपळगाव, वसूजळगाव व सुसरे येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, सोमनाथ खेडकर, खेर्डेच्या सरपंच आशाताई सांगळे, सांगावीच्या सरपंच सुर्वणा एकशिंगे, पागोरी पिंपळगावच्या सरपंच छाया दराडे, भगवान साठे, सचिन वायकर, गंगाधर सुपेकर आदी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, मताचे आकडे पाहून गावांचा विकास केला नाही. ज्या गावात अथवा ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी निधी दिला. अकोले सारख्या गावांमध्ये 15 साखळी बंधारे देऊन गाव व परिसराचे नंदनवन केले. मागील सरकारने मंजूर केलेले काम आघाडी सरकारने बंद केले. दोन वर्षे होत आले तरी पालकमंत्र्यांनी अजून शासकीय कमिट्या सुद्धा केलेल्या नाहीत.
पाऊस लांबल्याने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी पालकमंत्र्यांना भेटून करणार आहे.सध्याचे तीन पक्षाचे सरकार भाजप आमदार असलेल्या मतदारसंघात विकास कामांना निधी देत नाही. गेल्या दीड वर्षात निधी मिळाला नाही. भूमिपूजन होत असलेली कामे मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. पंकजा मुंडे मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू करून मोठा निधी दिला. त्यामुळे जलसंधारणाची अधिक कामे झाली.
दरम्यान, माजी सभापती तथा आमदार मोनिका राजळे यांचे कट्टर समर्थक विष्णुपंत अकोलकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे व तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांचा नामोल्लेख टाळून खेर्डे येथील कार्यक्रमात बोलताना उत्तर दिले. आता नवीन अध्यक्ष झाले, यापूर्वी कधी बाहेर पडले नाहीत. कोणाच्या सुख-दुःखात आले नाहीत. कधी कुणाला चहा सुद्धा पाजला नाही. दुसर्याला पैसे द्यायला लावले, असा टोला शिवशंकर यांना लगावला.
अॅड. प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता बोलताना अकोलकर म्हणाले, आमचा नाद करू नका, केला तर महागात पडेल. सगळं बाड बाहेर काढू. बाजार समितीचे 62 भूखंड कोणी विकले, याची सर्वांना माहिती आहे. तालुक्यातील जनता आता सहजासहजी फसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
Comments